712 | इको फ्रेण्डली गणपती, शेततळ्यात तरंगणारा आणि ऊसापासून तयार केलेला बाप्पा

606 views · Published 13 September 2018 · 1:00 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

औरंगाबादच्या खिर्डीमध्ये कुलस्वामिनी गणेश मंडळाने पाण्यावर तरंगणारा गणपती तयार केला आहे. शेततळ्यामध्ये 69 बाय 8 फूट आकाराचा हा गणपती तयार करण्यात आला आहे. गहू, कोथिंबीर, लाल माठ, मेथी, पालक, मनी प्लांट आणि वेगवेगळ्या फुलांच्या रोपांचा यात वापर केला आहे. जवळपास दीड वर्षांपर्यंत हा गणपती असाच पाण्यावर तरंगत राहिल असं सांगण्यात येत आहे. दुसरा इको फ्रेंडली गणपती आहे कर्नाटकचा. बेंगलुरुच्या श्री सत्य गणपती ट्रस्टने ऊसापासून गणपती तयार केला आहे. यासाठी जवळपास 5 टन ऊस लागला. गेल्या महिनाभरापासून दीडशे कलाकार हा गणपती तयार करत आहेत.

More from this channel