स्पेशल रिपोर्ट | लातूर | आधी रस्त्याची स्वच्छता, मग मिरवणूक, लातुरातील गणेश मंडळाचा उपक्रम
1,693 views · Published 25 September 2018 · 2:27 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर फुलं, गुलाल यांसह अनेक गोष्टींमुळे अस्वच्छता निर्माण होते. हे लक्षात घेऊन लातुरातील औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललं. विसर्जनासाठी शेवटचा मान असलेल्या लातुरातील या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्ग स्वच्छ करुन गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ गेली पाच वर्षे हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. गणेशोत्सव उत्सवाचा अन् उत्साहाचा सण असला, तरी या माध्यमातूनही अनेकजण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असतात. कुणी मदत करत असतो, तर कुणी स्वत: सक्रीयपणे काम करत असतो. लातुरातील औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने सक्रीयपणे काम करुन, आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!