अकोला | पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत स्वतः साफ केली, अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची गांधीगिरी

1,762 views · Published 4 September 2018 · 1:10 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या एका 'गांधीगिरी'ची अकोल्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. या 'गांधीगिरी'ने सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणाऱ्या 'पिचकारीवीरां'च्या मनोवृत्तीच्या कानफटात मारल्या गेली आहे. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काल अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील भिंती पान, खर्र्ऱ्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसल्या. मग, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बकेट आणि पाणी घेत ती भिंत साफ करायला सुरूवात केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चांगलंच खजिल व्हायची वेळ आली. या कार्यालयातील अस्वच्छतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना चांगलंच फैलावर घेतलं.

More from this channel