सोलापूर | मानाचा रोजगार, विडी वळणाऱ्या महिलांचे हात यंदा बाप्पाची मूर्ती रंगवणार

1,311 views · Published 23 August 2018 · 0:30 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सोलापुरातल्या कष्टकरी विडी कामगार महिलांसाठी यंदाचा गणेशोत्सव खास असणार आहे.  गणपती बाप्पा या श्रमजीवी महिलांसाठी जणू तारणहार बनलाय. आरोग्यास धोकादायक असलेल्या विडी उद्योगात कार्यरत असणाऱ्या महिला यंदा मूर्तीच्या रंगकामात गुंतल्या आहेत. या प्रशिक्षित महिलांनी रंगवलेल्या मूर्ती गणेश भक्तांना चांगल्याच भावल्या आहेत. सोलापुरातल्या विडी कामगार महिलांचे हात आता गणेश मूर्ती रंगवू लागलेत. या नव्या   उद्योगामुळ विडी कामगार महिलांना शाश्वत उत्पन्नाच साधन निर्माण झालंय.

More from this channel