यवतमाळ | वाघिणीच्या शोधमोहीमेला मोठा धक्का, इटालियन कुत्रे आणि पॅरामोटर परत पाठवली

2,530 views · Published 22 October 2018 · 1:11 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यवतमाळच्या टी 1 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणण्यात आलेले 2 इटालियन कुत्रे आणि पॅरा मोटर परत पाठवण्यात आले आहेत..यामुळं टी 1 वाघिण पकडण्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.. मागील 39 दिवसांपासून यवतमाळच्या जंगलात टी 1 वाघिणीला पकडण्यासाठी मोहीम सुरु आहे..पॅरा मोटर ही उंचावरुन उडत असल्यानं दाट जंगलात वाघिणीचा शोध लागणं अवघड असल्याचं मानलं जातंय़..त्यामुळं वनविभागाला आता केवळ वाघिणीचे पगमार्क मिळवणे, गस्त घालणे आणि कॅमेरा ट्रॅपवरच अवलंबून राहावं लागतंय..

More from this channel