मॅनहोलमध्ये गुदमरुन तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू | डोंबिवली | एबीपी माझा

681 views · Published 27 October 2018 · 1:13 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मॅनहोलमध्ये पडून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडलीय. खंबाळपाडा एमआयडीसी परिसरात रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या मेनहोलची सफाई करण्यासाठी हे तिघं आले होते. यावेळी त्यांच्यापैकी एकजण आतमध्ये उतरला, मात्र तो गुदमरल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार आत गेला, मात्र हे दोघंही आत अडकून पडल्यानं त्यांना वाचण्यासाठी तिसरा कामगार आत गेला आणि या तिघांचाही गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. देविदास पाजगे, महादेव झोपे आणि चंद्रभान अशी या तीन मृत कामगारांची नावं आहेत. दरम्यान, हे तिघे ज्यावेळी मेनहोलच्या सफाईसाठी आत उतरले, त्यावेळी मास्क, सेफ्टी बेल्ट अशा कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपयोजना करण्यात आल्या नसल्याची बाब समोर आलीय.

More from this channel