मुंबई | महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे कोलमडण्याच्या स्थितीत, वित्त आयोगाचं शिक्कामोर्तब

2,774 views · Published 15 September 2018 · 5:29 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचं शिक्कामोर्तब 15 व्या वित्त आयोगानं केलंय. राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाली असून, भाजप सरकारच्या काळात कर संकलन 17 पूर्णांक तीन टक्क्यांवरुन 11 पूर्णांक 5 टक्क्यांवर आल्याच वित्त आयोगानं स्पष्ट केलंय. तसेच, विविध जिल्ह्यात प्रचंड आर्थिक दरी असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचं दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरीपेक्षा अत्यंत कमी असल्याचं आयोगाने नमूद केलंय. त्यामुळे वित्त आयोगाचा हा अहवाल म्हणजे राज्य सरकारवर एकप्रकारचं आरोपपत्रच असल्याचं बोललं जात आहे.. फडणवीस सरकारच्या दाव्याची केंद्राच्या वित्त आयोगाकडून पोलखोल करण्यात आली असून, राज्यातील आर्थिक गैरव्यवस्थापनाचे अनेक मुद्दे आयोगाकडून व्यवस्थित उपस्थित केले गेलेत. वित्त आयोग 17 सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, व्यापारी उद्योगपती यांची आयोगाकडून भेट घेतली जाईल.

More from this channel