पिंपरी | हिंजवडी पोलिसांनी विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी तरुणीला चार तास बसवून ठेवलं

1,885 views · Published 26 September 2018 · 1:48 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विनयभंगाची तक्रार दाखल करायला आलेल्या आयटी अभियंता तरुणीला पोलिसांनी चार तास बसवून ठेवल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत घडली. 9 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली होती. संबंधित तरुणीने याप्रकरणी पोलीस आयुक्तांनाच आता नोटीस पाठवली आहे. तक्रार दाखल करुन न घेता तरुणाला परत पाठवण्यात आलं. तो आरोपी पुन्हा दिसला. तेव्हा फिर्यादी आणि आसपासच्या लोकांनाच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडायला सांगितलं. पोलिसांचा प्रताप इथेच थांबला नाही तर तक्रार करू नये म्हणून पोलिसांनीच धमकावलंही, असा आरोप तरुणीने केलाय. पीडित तरूणीने वकिलाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आता मात्र हिंजवडी पोलिसांना हे प्रकरण भोवताना दिसतंय.

More from this channel