कोल्हापूर | सुप्रीम कोर्टाचा दणका, महापालिकेतील या 20 नगरसेवकांचं पद रद्द

2,417 views · Published 23 August 2018 · 1:12 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपच्या एकूण 20 नगरसेवकांचं पद रद्द केलं आहे. या प्रकारामुळे कोल्हापूर महापालिकेत खळबळ माजली आहे. आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर सहा महिन्यात जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. मात्र या नगरसेवकांनी निर्धारित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचं पद रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ते निवडणूक पुन्हा लढवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 आणि काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचं पद रद्द करण्यात आलं आहे. तसंच भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या एकूण 9 नगरसेवकांचं पद रद्द करण्यात आलं आहे. यामध्ये अश्विनी रामाणे, स्वाती येवलुजे आणि हसीना फरास या तीन माजी महापौरांचा समावेश आहे.

More from this channel