कल्याण : लॉटरीचं तिकिट छापून पैसे उकळण्याचा प्रयत्न, चौघांना अटक

2,904 views · Published 1 August 2018 · 0:47 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

झटपट श्रीमंत होण्यासाठी खोट्या नोटा छापणारे, लोकांना गंडवणारे आजवर अनेक जण आपण पहिले असतील. मात्र एका रात्रीत करोडपती होण्यासाठी एका भामट्यानं चक्क लॉटरीचं खोटं तिकीट छापल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आणलाय. सहास कदम असं या भामट्याचं नाव असून तो नालासोपाराचा रहिवाशी आहे. विशेष म्हणजे आपल्याला लॉटरी विक्रेत्याने फसवल्याचा कांगावा करत याच भामट्याने लॉटरी विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तपस करत हा सगळा बनाव उघड केला. सुहासकडे असलेलं हे तिकीट त्याचे मेव्हणे अरुण गावडे आणि मंगेश गावडे यांनी सावंतवाडी इथं स्वतः तयार केलं होतं. लॉटरीची सोडत जाहीर झाल्यावर त्यातला १ कोटीची लॉटरी लागलेल्या तिकिटाचा क्रमांक आणि कल्याणच्या प्रिन्स लॉटरी सेंटरचा खोटा शिक्काही त्यावर मारण्यात आला. मात्र अखेर हा सगळं बनाव उघड झाला. याप्रकरणी सुहास कदम सोबतच त्याचे दोन्ही मेव्हणे आणि अन्य एक साथीदार  अशा चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

More from this channel