पाकिस्तान | इम्रान खानच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा

964 views · Published 18 August 2018 · 5:13 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान आज शपथ घेणार आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होईल. इस्लामाबादमध्ये हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी भारताचे माजी कसोटीवर आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित राहाणार आहेत. अटारी-वाघा बॉर्डरवरून सिद्धू पाकिस्तानात दाखल झाले आहेत. सिद्धू यांच्या व्यतरिक्त माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनादेखील शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण होतं. पण वैयक्तिक कारणास्तव त्यांनी आमंत्रण नाकारलं. इम्रान खान यांच्या पक्षाला २७२ पैकी फक्त ११६ जागांवर विजय मिळाला होता. पण अन्य छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी जेमतेम बहुमत मिळवलं. पंतप्रधान निवडीसाठी पाकिस्तानातील नॅशनल असेंबलीमध्ये शुक्रवारी मतदान झालं. यात इम्रान खान यांनी १७६ मतं मिळवून पंतप्रधानपदी आपलं नाव कोरलं.

More from this channel