उस्मानाबाद | विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांवर कारवाई सुरु

2,810 views · Published 8 September 2018 · 1:18 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र (निवडणुकीवेळी सादर केलं नसल्यास) सादर न करणाऱ्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबतचं पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून विभागीय आयुक्तांना देण्यात आलं आहे. 
राज्य निवडणूक आयोगाकडून सात सप्टेंबरला हे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते महापालिकेपर्यंत अनेक सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई सुरू झाली आहे.

More from this channel