ठाणे | शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे दुचाकी अपघात, दोन्ही मुलांना गमावणाऱ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी

3,703 views · Published 27 August 2018 · 1:58 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात होऊन रक्षाबंधनच्या दिवशीच बहीण-भावाला प्राण गमवावे लागलेत.  तर त्यांचे आई-वडील जखमी झाले आहेत. आसनगावला नातेवाईकांकडे रक्षाबंधन करुन परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
शहापूर तालुक्यातील अवरे गावात राहणारे प्रकाश बरकू घरत पत्नी आणि दोन मुलांना घेऊन मुंबई-नाशिक महामार्गावरुन बाईकने निघाले होते. महामार्गावर पडलेले खड्डे चुकवताना त्यांची बाईक खड्ड्यात आदळून पडली.
अपघातात घरत दाम्पत्य रस्त्याच्या एका बाजूला पडलं, तर दोन मुलं रस्त्यात पडली. त्याच वेळी मागून येणारी लोडिंग गाडी बाईक आणि मुलांच्या अंगावरुन गेली.
यामध्ये 10 वर्षीय सचिन घरत आणि 15 वर्षीय कामिनी घरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती प्रकाश आणि पत्नी रेखा घरत गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे खड्डे आणखी किती बळी घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय.

More from this channel