बीसीसीआय धोनीऐवजी आता पंतला आजमवणार, रोहित शर्माचं कसोटीत पुनरागमन

1,518 views · Published 27 October 2018 · 0:39 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघातून अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आलं आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात तीन-तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकांमध्ये खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी धोनीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. या दोन्ही मालिकांसाठीच्या भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही संघांत दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा राहिल.

More from this channel