यवतमाळ | मारहाण करणाऱ्या पोलिसाविरोधात 'शोले स्टाईल' आंदोलन

4,639 views · Published 30 August 2018 · 0:59 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पोलीस ठाणेदार यांनी मारहाण केल्याचा निषेधार्थ एका व्यक्तींने पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या टॉवर वर चढून विरुगीर करीत आंदोलन सुरू केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस स्टेशन च्या आवारात हा प्रकार घडला आहे. श्रावण राठोड या चाणी गावातील व्यक्तीला पोलिस ठाणेदार सारंग मिराशी यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. श्रावण राठोड चे गावातील एका  व्यक्ती सोबत भांडण झालं होतं. त्यामुळे लाडखेड पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत तो टॉवरवर चढला आहे. जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा आंदोलकानं घेतला आहे.

More from this channel