मुंबई : 'मी मुख्यमंत्री बोलतोय' कार्यक्रमात कोट्यवधींचा घोटाळा, काँग्रेसचा आरोप

1,084 views · Published 13 August 2018 · 0:59 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गेल्या १० महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रसारित न होऊनही सरकारी तिजोरीतून कार्यक्रमाची बिलं परस्पर अदा करण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. काही न करता या कंपनीला 10 महिन्यात 2 कोटी 36 लाख रुपये देण्यात आले. या कार्यक्रमासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाची सर्व यंत्रणा वापरली जात होती. आपल्या मर्जीतील लोकांना फायदा व्हावा म्हणून हे केले गेले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

More from this channel