मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ यंदाही कायम

669 views · Published 4 August 2018 · 2:08 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ पहायला मिळतोय. तिसरी यादी जाहीर होऊनसुद्धा अद्यापही 50 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत. ऐशी-नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून सुद्धा पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा यासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी कॉलेज प्रवेश रद्द केल्यानंतर त्यांना चौथ्या यादीत अर्ज करून प्रवेश घेता येणार होता. मात्र अशा विद्यार्थ्यांना आता चौथ्या फेरीसाठी फॉर्म भरता येत नसल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात पालकांच्या विद्यार्थ्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र या कार्यालयातील अनेक कर्मचारी रजेवर आहेत तर शिक्षण उपसंचालक बैठकीसाठी बाहेरगावी आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्तापाला सामोरं जाव लागतंय.

More from this channel