कोल्हापूर : एका दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स, कोल्हापुरात 'झिरो पेंडन्सी' उपक्रम
3,314 views · Published 29 June 2018 · 1:21 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कोल्हापूरच्या परिवहन कार्यालयाद्वारे आता अवघ्या एका दिवसात वाहन चालवण्याचे लायसन्स देण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ड्रायव्हिंग टेस्ट झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांत वाहनचालकांना आपले पक्के लायसन्स मिळत आहे. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या कागदपत्रांसाठी सर्वसामान्यांना अनेकदा सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागतात. यामध्ये पैसा आणि वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो. अशातच ‘झिरो पेंडन्सी’ सारख्या उपक्रमांद्वारे अवघ्या एका दिवसात शिकाऊ आणि पक्के लायसन्स मिळत असल्याने वाहनचालकांनीही आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा दिल्यानंतर सरकारी कार्यालयांचेही डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया चालू झाली होती. कोल्हापूर परिवहन कार्यालयाद्वारे राबवला जाणारा हा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. देशभरात अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात यावा, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!