ब्रेकफास्ट न्यूज | जालना | राशी सिड्स कंपनीला 36 लाखांच्या भरपाईचे आदेश
1,777 views · Published 25 August 2018 · 0:32 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बोंडअळीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना राशी सिड्स कंपनीने 36 लाख 83 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाने बियाणे कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या आडगावच्या शेतकऱ्यांना न्यायालयाच्या या निर्णयाने दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर राज्याच्या निविष्ठा व गुण नियंत्रकांनी राशी कंपनीला नुकसान भरपाईचे आदेश दिलं होते. याविरोधात राशी सिड्स कंपनीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राशी सिड्स कंपनीला याचिका दाखल करतानाच 36 लाख 83 हजार रुपये डिपॉझिट करायला लावले आणि सात ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 223 शेतकऱ्यांना भरपाई म्हणून हे पैसे वाटप करण्याचे आदेश दिले. जालना जिल्ह्यातील 223 शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात तक्रारीचा पाठपुरावा केला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!