कल्याण : शिवसैनिकाकडून पत्नीवर अत्याचार

3,552 views · Published 2 August 2018 · 0:33 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शिवसैनिकाने त्याच्या पत्नीचा अनन्वित छळ करत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आलाय. संजय मोरे असं या शिवसैनिकाचं नाव असून पत्नीच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिवसेना खासदारांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात तपासणी केल्यानंतर ही बाब उघड झाली.यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याचं लग्न झालं. मात्र लग्नानंतर त्याने पत्नीचा अनन्वित छळ आणि मारहाण सुरु केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याणात महाआरोग्य शिबीराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात मोरेच्या पत्नीनं आरोग्य तपासणी केल्यावर तिची तब्येत खालावल्याचं समोर आलं आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.

More from this channel