मुंबई | उद्यापासून मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर येणार

1,066 views · Published 31 August 2018 · 0:39 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशातील पहिली मोनोरेल उद्यापासून पुन्हा ट्रॅकवर येत आहे. उद्या सकाळी सहा वाजता पहिली मोनोरेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटणार आहे. ही मोनो रात्री दहा वाजेपर्यंत मोनोरेलची सेवा कार्यरत राहणार आहे. दर पंधरा मिनिटांनी सुटणार आहे मोनो दिवसभरामध्ये 130 फेऱ्या मारणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आलंय. .गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसूर कॉलनी स्थानकात डब्ब्यांना आग लागल्यानंतर मोनोरेलची सेवा दहा महिन्यांपासून बंद आहे. ((तर दुसरा टप्पा 2 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. मोनोरेलची सेवा बंद झाल्याने एमएमआरडीएला दर महिन्याला 1 कोटी 80 लाख रुपयांचा तोटा होत आहे. दरम्यान, मोनोरेल चालवण्याचा खर्चात मोठी वाढ होणार आहे.

More from this channel