मुंबई | वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या यादीत मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांचंही नाव
2,469 views · Published 13 August 2018 · 1:29 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या यादीत केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव नसून, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचेही नाव आहे. दस्तुरखुद्द परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीच याची माहिती दिली आहे. मात्र, रावतेंनी आपलं नाव कसं आलं असाव, याचं स्पष्टीकरणही सोबत दिले आहे. ई-चलनच्या थकबाकी यादीत मुख्यमंत्रीच नाहीत, तर माझंही नाव आलंय. मात्र साध्य मी वाहन चालवत नाही. माझ्या घरचं वाहन चालवत असताना नियमांचं उल्लंघन झालं असेल, असे दिवाकर रावते म्हणाले. “वसुली का होत नाही, याची आजच्या रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कारणमीमांसा झाली. वाहन चालकांनी वाहन घेताना स्वतःच्या मोबाईल नंबरऐवजी एजंटचा नंबर दिला, तर सर्व नोटीस त्या एजंटला जातात. मी निर्देश दिलेत की, आता यापुढे वाहन घेताना एजंटचा नंबर नाही, तर मालकाचा नंबर घेणे अनिवार्य असेल. परंतु आता आमच्याकडे ज्यांचे पत्ते आहेत, त्यांना पोस्टाने नोटिसेस पाठवणार आहोत”, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!