ब्रेकफास्ट न्यूज | सोलापूर | शेतातला शेतकरी ते कांदबरी लेखक, पांडुरंग मोरे यांच्याशी खास गप्पा
2,592 views · Published 8 October 2018 · 12:06 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्ही आयुष्यातल्या कितीही अडचणींवर मात करु शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरचे पानगावचे शेतकरी पांडुरंग मोरे. पांडुरंग हे खरंतर हाडाचे शेतकरी. शेतात काम करता करता त्यांना कथा-कविता सुचतात आणि याच कथेच्या एकूण सहा कादंबऱ्या त्यांनी आजवर लिहल्या आहेत. पांडुरंग यांनी गेल्या पाच वर्षात दोन इंग्रजी कादंबऱ्या, तीन इंग्रजी नाटकं, दोन इंग्रजी कवितासंग्रह लिहले आहेत. त्यांची सध्याची प्रकाशित झालेली कादंबरी, किंगडम इन ड्रीम- दी प्राईम मिनिस्टर, ही सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. पांडुरंग यांच्यातल्या लेखकानं अनेकांना प्रेरणा दिली आहे. बार्शी-सोलापूर रस्त्यावरचं पानगाव हे पांडुरंगच यांचं मूळ गाव...पानगावातच पांडुरंग यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. बार्शीत बीए पूर्ण केलं. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून एम एची पदवी घेतली. पाडुरंग यांनी आपलं संपूर्म लिखाण इंग्रजीतून केलेलं आहे. त्यांना बारावीला इंग्रजीत खरंतर फक्त ४५ मार्क होते. पानगावातला शेतकरी ते आंतराराष्ट्रीय पातळीवरचे लेखक हे झेप त्यांनी कशी घेतली हे त्यांच्याकडुनच जाणुन घेऊया
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार