Gadkot Mohim Samarop Rahul Solapurkar Speech : गडकोट मोहीम समारोप 2018

1,463 views · Published 15 March 2018 · 16:39 · Indexed 4 November 2026

Channel: Om Said · 2018 · Autos & Vehicles

Watch on YouTube

Gadkot Mohim Samarop Rahul Solapurkar Speech  :  गडकोट मोहीम 2018 
चार दिवसांचा भाकरतुकडा  पाठीवर बाळगुन चालायचंय कारण
गडकोटांच्या  मोहिमेत  कुठल्याही  #हाॅटेलात शिरून  कोबंडीची तंगड्या अन लाल पांढरा रस्सा वरपणारी  पोरं उपाशी राहुन गणिमांच्या देहाची 
" कपाशी "  करणा-या मावळ्यांच्या निष्ठेस काय समजणार ... ??
  चार दिवस धारकरी बनुन जगताना  मोहिमेच्या वाटेवरील एकाही कुणब्याच्या शेतातील कादां मुळ्यास हात लावायचा नाही .कारण " शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही  " हि शिवरायांची शिकवण फक्त आज्ञापत्रात वाचायची नाही तर ती धारक-यांनी  आचरणात  आणायची असते. मिळेल ते खायचे. दिसेल ते पाणी प्यायचे दगडावर सतरंजी अंथरूण त्याची ऊशी  करा
अन शेजारच्या कुठल्याही  जातीधर्माच्या ऊपाशी  धारक-याच्या मुखात आपल्या दशमीतील चार घास खाऊ घाला . कारण #ब्राह्मण कायस्थ #मराठा   #महार मागं रामोशी  ह्यांना  सोबत घेऊन शिवरायांनी #स्वराज्य कसे घडवले ह्याचा  प्रत्यय कथापुस्तकात नव्हे तर ह्या  #सह्याद्रीच्या  रानवाटात येत असतो.
कुठल्याही रहदारीच्या रस्त्यावरून चालायचे नाही  तर
आडरानातील जगंलझाडीतील अनघड वाटा तुडवायच्या .
नुसत्या  रानवाटा  #महाबळेश्वर  #माथेरानच्या सैरसपाटीसम तुडवायच्या नाहीत. तर  त्या   वाटा खिडीं अन द-याखो-यातील  शिवरायांच्या  चरणधूळीस संपुर्ण शरीरावर भाळुन शिवकालात वावरायचं आहे . कारण शिवराय  न ऊमगलेल्यांना ती फक्त  माती असेल धारकरींना मात्र तो मावळ्यांनी ह्या मातीत आपल्या  देहाचं खोबरं  करून पतीतपावन बनवलेला सह्याद्रीचा गुलालभंडारा आहे. एकही दिवस अंघोळ  करायची नाही.
कारण अंघोळ  करून आपल्या थोर मराठा बापजाद्यांनी तुडवलेली महन्मंगल माती ह्या नश्वर शरीरावरून धुवून काढणे म्हणजे घोर पाप होय .
हि पावन मृदामाती धारकरींना  एखाद्या  पात्रात नव्हे  तर आपल्या  देहावर , श्वासाच्या अणुरेणुंवर घरी न्यायची असते .
मऊ मुलायम बिछायतीवर लोळुन कथा कादंबरी वाचुन शिवराय  कुणीही आळवतील. चार पंखे  अन एसी  लावुन लाखभर  रुपये ऊकळत शिवराय कुणीही समजावुन सागेंल. मात्र  जो ईतिहास  जिथे घडला तिथे तो जगायला फक्त  धारातीर्थ  मोहिमच  शिकवेल. आपले वादविवाद हेवेदावे बाजुला सारून  या .
डोईभराच्या उंचीची काठी पाठीवर नाचवत या मराठा अन मराठी दोन्ही  अहात ना ?? मग आपल्या  मराठमोळ्या  पेहरावाच्या निशाण्या अंगावर भाळुन या .
वारकरीसम डोईवर पांढरी मराठी टोपी लेवुनी या.
मुखी त्या  शिवशंभुचे नाव  आळवत या.

#मर्द अहात तर
चार दिवस शिवशंभुबद्दलची  निष्ठा पणाला लावत जगायला या .

ज्या  #पावनखिडींच्या वाटेने शिवरायांची पालखी गेली त्या  पालखीचे भोई  बनायला चला .
  सिद्दी मसुद बनुन  आपल्याच #देव #धर्म देशावर तरवारी चालवण्यापेक्षा   वीर बाजीप्रभु  देशपांडे  अन #वीर #शिवा #काशीद  बनुन पुन्हा खरे #शिवचरीत्र वाचवायला  चला .

#हिंदु  धर्माच्या मारेकरींनो ..
#धारकरी बनायला या. 
चला  #धारातीर्थ मोहिमेला .

More from this channel