मुस्लिम आणि धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक

3,501 views · Published 31 July 2018 · 0:45 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन तापलेलं असताना राज्य सरकारमध्ये आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे. याचपार्श्वभूमीवर आता मुस्लिम आणि धनगर समाजानंही आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला घेरण्याचा निर्णय घेतलाय.औरंगाबादमध्ये मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण लागू करावं अशी मागणी मुस्लिम जनजागरण समितीने केली आहे.  आठवडाभरात सरकारने निर्णय घेतला नाही तर मुस्लिमही रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आलाय. आज औरंगाबादमध्ये बैठक पार पडली, त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. तर तिकडे धनगर समाजानं आरक्षणासाठी 1 ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. शिवाय ज्याला जसं सुचेल तसं आंदोलन केलं जाईल असं धनगर समाज आरक्षण कृती समितीतीच्या नेत्यांनी म्हंटलंय.

More from this channel