नवी दिल्ली | गुरुग्राम जमीन खरेदी-विक्री प्रकरणी रॉबर्ट वढेरांविरोधात गुन्हा दाखल

586 views · Published 1 September 2018 · 1:38 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुग्राममधील जमीन खरेदी आणि विक्री प्रकरणी रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, डीएलएफ आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वढेरा यांनी तत्कालीन सरकारच्या काळात गुरुग्रामच्या शिकोहपूर गावात जमीन खरेद्री-विक्री व्यवहार केला होता. जमिनीचा हा व्यवहार झाला त्यावेळी रॉबर्ट वढेरा स्कायलाईट कंपनीचे डायरेक्टर होते.

More from this channel