कल्याण-शिळफाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे

584 views · Published 4 August 2018 · 0:40 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कल्याण-शिळफाटा या अतिशय महत्वाच्या आणि रहदारीच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेला पत्रव्यवहार करत खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. मात्र या दोन्ही विभागांनी दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची अवस्था बिकट झालीये. त्यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी स्वतः हातात घमेलं आणि फावडं घेत हे खड्डे बुजवले. शिळफाट्यावरून कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागात मोठी वाहतूक होते. इतक्या महत्त्वाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याकडे संबंधित विभागांनी दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जातोय.

More from this channel