मुंबई | चिमुकलीवर कवटी प्रत्यारोपणाची यशस्त्री शस्त्रक्रिया

4,104 views · Published 11 October 2018 · 2:35 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातील भारती विद्यापीठ हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांच्या टीमने एक विलक्षण कामगिरी केलीय. किडनी प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण आपण ऐकलच असेल. पण या डॉक्टरांनी 4 वर्षांच्या चिमुरडीवर चक्क कवटी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केलीय. अशाप्रकारची भारतातली ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावाही डॉक्टरांनी केलाय. मे 21017 मध्ये एका अपघातात ईशाताच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी तिच्या कवटीचा भाग काढुन ठेवण्यात आला. पण कवटीचा भाग काढल्यामुळे तिच्या चेहऱ्याचा आकार बदलला. त्यामुळे तिला सगळ्यांमध्ये मिसळण्यात अडचण येत होती. त्यामुळे तिची कवटी बसवणं आवश्यक होतं. इशितावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेतून कवटी मागवण्यात आली. मे 2018 मध्ये इशितावर ही कवटी प्रत्यारोपणाची शशत्रक्रिया करण्यात आली.

More from this channel