ठाणे | मिरा-भाईंदरमधील रस्ते आता चकचकीत होणार

1,640 views · Published 29 September 2018 · 2:32 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मीरा भाईंदर शहरात राहणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. 
शहरातीस रस्ते आता गोरेपान होणार आहेत. अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग या अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे रस्ते बनवले जाणार आहेत. त्यासाठी १०० कोटी रुपयांच कर्ज महापालिकेने एमएमआरडीए कडून घेतलंय. येत्या काळात काळेकुट्ट डांबरी रस्ते काल बाह्य होतील आणि त्याची जागा हे पांढरे रस्ते घेतील. अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग पद्धतीत रस्ता खोदून ४ ते १० इंचाचा सिमेंटचा थर दिला जातो. या पद्धतीने रस्ता बनवल्यास तो मजबूत आणि टीकावू होतो अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय. बंगळूरुमध्येही अशा प्रकारचे रस्ते बनवण्यात आले आहेत.

More from this channel