तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी मौन सोडलं!

4,097 views · Published 28 September 2018 · 1:00 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तनुश्री दत्ताने लावलेल्या आरोपांवर अभिनेते नाना पाटेकर यांनी अखेर मौन सोडलं आहे. "2009 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं होतं," असा आरोप माजी मिस इंडिया तनुश्री दत्ताने केला होता. या मुद्द्यावर बोलताना 67 वर्षीय नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताचे सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, "ती असं का करतेय, यावर मी काय बोलू शकतो? ती असं का बोलतेय हे मला कसं माहित असणार? लैंगिष शोषण म्हणजे तिला नेमकं काय म्हणायचं आहे? सेटवर माझ्यासोबत 50 ते 100 लोक होते." नाना पाटेकर पुढे म्हणाले की, "मी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. पण हे सगळं मीडियाला सांगून काहीही उपयोग नाही, कारण तुम्ही काहीही छापाल. ज्यांना जे बोलायचंय ते बोलू दे, मी माझं काम करत राहणार."

More from this channel