मुंबई : मल्टिप्लेक्सबाबतचं आमचं आंदोलन सुरुच राहणार, मनसेचा इशारा
1,213 views · Published 8 August 2018 · 2:51 · Indexed 28 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खाद्यपदार्थ विकणं नाही तर सिनेमा दाखवणं मल्टिप्लेक्सवाल्यांचं काम आहे, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं आज मल्टिप्लेक्स असोसिएशनला झापलं. सुरक्षेचं कारण देत मल्टिप्लेक्सवाल्यांनी सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ आणण्यास मनाई केली आहे. त्यावर इतर सार्वजनिक ठिकाणीही लोक घरचे पदार्थ खातात, तेव्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का., असा प्रश्न मुंबई हायकोर्टानं विचारलाय. दरम्यान, सरकारनं मल्टिप्लेकवाल्यांपुढे नांगी टाकल्याचं दिसतंय. कारण, सरकारनंही सुरक्षेचं कारण पुढे केलं आहे. शिवाय महाराष्ट्र पोलिस अॅक्टनुसार थिएटर्समध्ये खाद्यपदार्थ चढ्या दरांमध्ये विकल्यानं कारवाईबाबत तरतूदच नाही, असंही सांगण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे सातच दिवसांपूर्वी सरकारनं याबाबत नियमावली तयार केली होती. मात्र आता त्यातून माघार घेतली आहे. दरम्यान, हा प्रश्न आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टानं तूर्तास काही निर्णय देऊ नये अशी विनंती मल्टिप्लेक्स असोसिएशननं केलीय.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार