मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे ग्रंथालयासाठी आंदोलन | मुंबई | एबीपी माझा

874 views · Published 3 November 2018 · 0:44 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबई विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी काल कलीना येथील ग्रंथालयाजवळ आंदोलन केले. मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय आधी 24 तास खुले असायचे आता मात्र ते केवळ सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंतच खुले राहणार आहे. त्यामुळे रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. याविरोधात रात्री 11 च्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. ग्रंथालय बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना बाहेर पथदिव्याच्या परिसरात बसून, झाडांच्या खाली बसून अभ्यास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, यापैकी अनेक विद्यार्थी दिवसभर काम करतात आणि रात्री अभ्यास ग्रंथालयात बसून करतात. त्यांची यामुळे गैरसोय झाली आहे. तर परीक्षा तोंडावर असताना केवळ एक दिवस आधी नोटीस देऊन हा बदल करण्यात आलाय. त्यात अनेक कर्मचारी दिवाळीच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त त्रास होतो आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel