मुंबई | मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत द्या : हायकोर्ट

2,011 views · Published 11 September 2018 · 2:14 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षणासाठी मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पडताळून पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगानं आपला प्रगती अहवाल हायकोर्टात सादर केला. यावेळेस अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याबाबतची माहिती आयोगाकडून हायकोर्टात देण्यात आली. 
दरम्यान, चार आठवड्यांनी कामकाजाचा पुन्हा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

More from this channel