पुणे | रहिवासी इमारतींमध्येही काचेच्या लिफ्ट बसवा, आमदार अनंत गाडगीळ यांची मागणी

1,008 views · Published 22 October 2018 · 4:54 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यात लिफ्टमध्ये अडून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर आता उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून चर्चा सुरु झाल्या आहेत. लिफ्टमुऴे गेल्या दोन ते अडीच वर्षात 25 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 6 ते 7 मुलांचा समावेश आहे. त्यामुळं रहिवासी इमारतीत मॉलप्रमाणेच काचेच्या लिफ्ट असायला हव्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी केलीय. तसंच रहिवासी आणि सुरक्षा रक्षकांना लिफ्ट बंद पडल्यावर ती उघडण्याचं प्रशिक्षण देण्याची मागणीही गाडगीळ यांनी केलीय. पुण्यात मोमिनपुरा भागात नशरा खान ही चिमुकली लिफ्टमध्ये अडकून जखमी झाली होती. त्यानंतर उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

More from this channel