पुणे | कालवा फुटल्यानंतर पुण्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ

2,179 views · Published 28 September 2018 · 2:36 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खडकवासला धरणातून येणारा मुठा कालवा पर्वतीच्या जनता वसाहतीजवळ फुटल्यानं काल पुण्यात हाहाकार माजला..दांडेकर पुलाजवळची वसाहत अक्षरश: पाण्याखाली गेली..यात वाहनं आणि स्थानिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. दांडेकर पुलाजवळ असणाऱ्या वसाहतीतील लोकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय पालिकेनं महापालिकेच्या शाळांत केली आहे..दरम्यान लष्कर जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात आलाय..ज्या ठिकाणी कालवा फुटला होता..त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलंय. दरम्यान काही भागातील नागरिकांना आज टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे

More from this channel