भंडारा: बहुचर्चित प्रीति बारिया हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशी
4,086 views · Published 30 June 2018 · 1:09 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बहुचर्चित प्रीति बारिया हत्या प्रकरणात भंडारा जिल्हा न्यायालयनं दोघांना फाशी दिलीय. अमीर शेख आणि सचिन राऊत अशी यांची नावं आहेत. तीन वर्षापुर्वी म्हणजे 30 जुलै 2015 रात्री साडेआठ वाजता भंडारा शहराच्या समृद्धी नगरमध्ये ए सी दुरुस्त करण्याच्या बाहण्यानं या दोघांनी रूपेश बारिया यांच्या घरी प्रवेश केला.आणि 30 वर्षीय प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोड़ीनं वार करून हत्या केली. एवढंच नाही तर त्यांच्या 9 वर्षाचा मुलगा भव्य बारिया याच्या डोक्यावर हातोडीनं वार केले.यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर भव्य बारीया याला अर्धांगवायूने ग्रासलंय. तो आता बोलूही शकत नाही. आरोपी दोघांनी याच दिवशी सकाळी भंडारा शहरातील रवींद्र शिंदे यांच्या घरी त्यांच्या मुलीलाही मारहाण केली होती. त्यानतंर पोलिसांनी या दोघांना अटक केली आणि आज कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया