ब्रेकफास्ट न्यूज : महागठबंधन म्हणजे तेल-पाण्याचं मिश्रण : नरेंद्र मोदी
656 views · Published 13 August 2018 · 1:54 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना नरेंद्र मोदी यांनी ई-मेलद्वारे मुलाखती देण्याचा सपाटा लावलाय. जागरण या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी महागठबंधन म्हणजे तेल आणि पाण्याचं मिश्रण आहे. ज्यातल्या पाण्याचाही काही उपयोग नाही, आणि तेलाचाही वापर करता येत नाही, अशी स्थिती असल्याचं म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली. देशाला जातीवाद, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपेक्षा विकासावर जास्त विश्वास असल्याचंही मोदींनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर मोदींनी या मुलाखतीत देशातल्या 70 लाख तरुणांना रोजगार मिळाल्याचाही दावा केला आहे. विशेष म्हणजे देशात आरक्षण, विकास, रोजगार आणि मॉब लिंचिंगवरुन सुरु असलेल्या चर्चेलाही मोदींनी उत्तर दिलंय. दरम्यान ई-मेल द्वारे मुलाखत देणाऱ्या मोदींनी गेल्या 4 वर्षात एकही थेट पत्रकार परिषद घेतलेली नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!