चंद्रपूर | विदर्भात मुसळधार पाऊस, शेकडो एकर शेती पाण्याखाली
3,449 views · Published 18 August 2018 · 0:45 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हातल्या सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. जिल्हात जाणारे अनेक मार्ग पुराच्या पाण्यामुळं बंद झाले आहेत. तर शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. विशेष म्हणजे ही पूरपरिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यातल्या पावसामुळं नव्हे, तर अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं उद्धवली आहे. इथं झालेल्या मुसळधार पावसामुळं वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर आला आहे.तर इरई नदीचं पाणी चंद्रपूर शहरात शिरल्यानंही नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. इथला दाताळी इथला रस्ता वाहून गेल्यानं एमआयडीसीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!