मुंबई : कोळी महिलांचा एमएमआरसीविरोधात एल्गार

744 views · Published 4 August 2018 · 0:39 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मेट्रो तीन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गिरगावातील चिरा बाजार येथील कोळी महिलांनी एमएमआरसीविरोधात एल्गार पुकारलाय. मेट्रो प्रकल्पामुळे चिरा बाजार मच्छी मार्केटचे तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे. मात्र ज्या ठिकाणी हे स्थलांतर केले जाणार आहे तिथ जायला कोळी महिलांनी नकार दिलाय. दुसरीकडे स्थलांतर करताना एमएमआरसी इतर व्यापाऱ्यांना 20 ते 25 हजार रुपये भाडे देणार आहे. मात्र कोळी महिलांना केवळ दोन हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.

More from this channel