ठाणे | रेल्वेच्या धडकेत जखमी व्यक्तीची 6 तास मृत्यूशी झुंज, मृतदेह लोकलमधून नेला

2,315 views · Published 15 October 2018 · 2:55 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

रेल्वे प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे एका व्यक्तीचा हकनाक बळी गेल्याची घटना दिवा ते तळोजादरम्यान घडली आहे. रुग्णवाहिकेअभावी जखमी व्यक्तीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे या व्यक्तीच्या मृतदेहाची दिवा-ठाणे लोकलमधून फरफट करण्यात आली. कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दिवा ते तळोजा स्थानकादरम्यान व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही माहिती दिवा स्टेशनला पोहोचेपर्यंत रात्रीचे अडीच वाजले. मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने रात्री 2.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत काहीच हालचाल केली नाही. एवढ्या रात्री घटनास्थळी जाण्यासाठी अॅम्ब्युलन्सच उपलब्ध नसल्याचं कारण रेल्वेकडून देण्यात आलं. त्यामुळे उपचाराअभावी या व्यक्तीचा मृत्यू झाला.

More from this channel