'केडीएमसी'च्या शिवसेना नगरसेविकेचं पद रद्द | कल्याण | एबीपी माझा
939 views · Published 27 October 2018 · 0:47 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मोठा फटका बसला. विद्यमान शिवसेना नगरसेविका आणि माजी महापौर वैजयंती घोलप यांचं नगरसेवकपद रद्द झालंय. घोलप यांनी 2010 मध्ये त्यांचा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी धनगर जातीचं प्रमाणपत्र जोडत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांना महापौरपदही मिळालं होतं. मात्र घोलप या धनगर नसून खाटीक आहेत, तसंच खाटीक ही जात अनुसूचित जमातींमध्ये येत असल्यानं त्यांनी ओबीसी प्रवर्गातून लढवलेली निवडणूक रद्द ठरवण्याची मागणी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार गौरव गुजर यांनी केली होती. जातवैधता समितीने पुराव्यांच्या आधारे घोलप यांचं ओबीसी प्रमाणपत्र रद्द केलं होतं. उच्च न्यायालयानही घोलप यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर आज डीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी वैजयंती घोलप यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांचं नगरसेवकपद रद्द केलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!