अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एकाच सोसायटीत डेंग्यूचे आठ रुग्ण आढळले
1,084 views · Published 20 August 2018 · 0:44 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अंबरनाथमध्ये एकाच सोसायटीत राहणाऱ्या तब्बल आठ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं मोहीम हाती घेतली आहे. अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरीवली पाडा परिसरात अनेक नवीन बांधकामं सुरू आहेत. या भागातील विश्वजीत ग्रीन्स संकुलात राहणाऱ्या आठ जणांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांना डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!