कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी विविध राजघराण्यातील मंडळी रस्त्यावर

2,611 views · Published 4 August 2018 · 0:43 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरात विविध राज घराण्यातील मंडळी आज रस्त्यावर उतरली. मराठा समाजाला आरक्षण नंतर ज्या सरदार आणि जहागीरदार घराण्यांनी हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं, त्याच घराण्यातले लोक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. महाराणी ताराबाईंच्या पुतळ्याजवळ भगवा झेंडा फडकावून शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर दसरा चौकात आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठिंबाही दिला. या आंदोलनात घोरपडे, चव्हाण, गायकवाड, शिंदे, खानविलकर यांच्यासह विविध राजघराण्यांतील मंडळीनी सहभाग नोंदवला.

More from this channel