अकोला | खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना तुडवून मारा, राजू शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य

1,797 views · Published 4 October 2018 · 1:19 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांनी कपडे काढून मारलं पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. अकोला जिल्ह्यातील निंबा गावात आयोजित जाहीर सभेत राजू शेट्टी बोलत होते. राज्यभरातील गावागावात जाऊन भाषणं ठोकणाऱ्या, मिरवणाऱ्या आणि खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहिजे. खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना नुसतं ठोकलं नाही पाहिजे, तर कपडे फाडून तुडवलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मतं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं. अकोल्यात दोन-तीन मंत्र्यांना कपडे काढून मारा. पोलीसही तुम्हाला काही करणार नाहीत. तेही या सरकारला त्रासले आहेत, असं राजू शेट्टी जाहीर सभेत म्हणाले.

More from this channel