मुंबई : विधानपरिषदेसाठी भाजप आज उमेदवार घोषित करणार

4,900 views · Published 4 July 2018 · 1:43 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी आज भाजप पाच उमेदवारांची घोषणा करणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपच्या कोट्यातून भाई गिरकर, महादेव जानकर, यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर कोळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी ठाण्याच्या कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांचं नाव पुढं केलं जात आहे.  मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड या कोकण किनारपट्टीत एकूण 76 मतदारसंघात कोळी समाजाची निर्णायक मतं असून त्यातील किमान 45 ते 50 जागा जिंकण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे.

More from this channel