नंदुरबार | रंगावली नदीच्या पुलावरील खड्ड्यात बस अडकली

1,092 views · Published 5 September 2018 · 0:44 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नंदुरबारच्या नवापूर येथील रंगावली नदीवरील पुलावर बस अडकली. गेल्या महिन्यात नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रंगावली नदीला पूर आला होता. या महापुरात पुलावर मोठा खड्डा पडला. या खड्ड्यात ही बस अडकली आहे. रंगावली नदीवरील पूल नगरपालिकेने वाहतुकीसाठी बंद केला आहे. मात्र, गुजरात डेपोच्या अहमदाबाद-भुसावळ बसचालकाने या पुलावरुन बस घेतली आणि ती या खड्ड्यात अडकली. यावेळी बसमध्ये 10 प्रवासी होते, तरी स्थानिकांनी वेळीच मदत करुन त्या बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. त्यामुळे सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घ़डला नाही.

More from this channel