#MeToo | गायिका सोना मोहापात्राचे कैलाश खेरवर गैरवर्तनाचे आरोप
1,566 views · Published 10 October 2018 · 1:00 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने दिग्गज गायक कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. 'मुंबईत एका कॅफेमध्ये कॉन्सर्टविषयी बोलण्यासाठी आम्ही भेटलो. त्यावेळी कैलाश यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. बरं झालं, एखाद्या अभिनेत्याऐवजी तू संगीतकाराला म्हणजेच राम संपतला जोडीदार म्हणून लाभलीस, असं कैलाश खेर म्हणताच मी तात्काळ निघून गेले. पण त्यांना फरक पडला नाही' असा दावा सोनाने केला आहे. ढाका विमानतळावर उतरल्यावर मी त्यांचा फोन घेतला नव्हता. तेव्हा आयोजकांच्या फोनवरुन त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. साऊंड चेक रद्द करुन त्याऐवजी माझ्यासोबत वेळ घालवण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला, असं सोनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. 'किती महिलांची माफी मागाल? आता सुरुवात केली, तर आयुष्य कमी पडेल' असा खोचक टोलाही तिने लगावला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!