ब्रेकफास्ट न्यूज | अॅसिड हल्ला पीडितांनी गणपतीचा मंडप सजवला; स्नेहा जावळे, सुमीत पाटीलशी गप्पा
575 views · Published 10 September 2018 · 12:20 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खूप जुनी म्हण आहे दिसतं तसं नसतं. पण दुर्देवानं आपल्या समाजात दिसण्याला किंवा एखाद्या व्यक्तिच्या बाह्य रुपालाच अधिक महत्व दिलं जातं. पण यापलिकड़े जात व्यक्तिच्या मनातलं सौंदर्य आणि त्याच्या हातातली कला याला गणपतीच्या निमित्तानं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलंय ड़िलाईल रोड़च्या पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंड़ळाने. कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी आपल्या समाजातील अॅसिड़हल्ला ग्रस्त आणि बर्न व्हिक्टीम असलेल्या महिलांना गणेश सजावटीत अग्रस्थान दिलं संजीवनी या संकल्पनेवर आधारीत सजावटीत पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देत माचिसकांड़्या, आरसे, शेण, मेण, लोकर, कापड़, कागदी लगद्यापासून एकूण आठ गणेशमूर्ती साकारल्या गेल्यात. --------- या गणेशमूर्ती आणि इथली सजावट करण्यात आघाड़ीवर होत्या अॅसिड़ हल्यातुन बचावलेल्या तसंच घरगुती हिंसाचारातून ज्यांना जाळल्या गेलेल्या पण सुदैवानं वाचलेल्या आणि आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केलेल्या अनेक महिलांचा समावेश होता. या सजावटीचं वैशिष्ट्यं म्हणजे दृष्टीहिनांना देखिल ही सजावट अनुभवता येण्यासाठी विशेष सोय केली आहे. काही ठिकाणी सामाजिक संदेश ब्रेल लिपीत लिहले गेलेत. ख-या अर्थानं अर्थपूर्ण असलेल्या या सजावटीचे निर्माते सुमित पाटील आणि बर्न व्हिक्टीम असलेल्या स्नेहा जावळे आपल्यासोबत आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!