मुंबई | नेस वाडियांना दिलासा, प्रीती झिंटाने दाखल केलेला गुन्हा रद्द होणार
1,013 views · Published 10 October 2018 · 0:36 · Indexed 19 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई उच्च न्यायालयाने उद्योजक नेस वाडियाला मोठा दिलासा दिला आहे. अभिनेत्री प्रीती झिंटानं नेस वाडियांविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश हायकोर्टानं दिला आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे यांच्या चेंबरमध्ये बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता ही सुनावणी झाली. प्रीती झिंटा आणि नेस वाडिया हे दोघेही या सुनावणीसाठी दालनात हजर होते. 2014 साली आयपीएल सामन्यादरम्यान नेसनं विनयभंग केल्याचा प्रीतीचा आरोप होता. प्रीतीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नेसनं हायकोर्टात धाव घेतली होती. नेमक्या कोणत्या कारणामुळे हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दोन्ही बाजूच्या वकिलांनीही नेसनं माफी मागितली की नाही हे सांगण्यास कोर्टाने मनाई केली असल्याचं सुनावणीनंतर बाहेर आल्यावर सांगितलं. त्यामुळे नेसनं माफी मागितली की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!