चेन्नई: करुणानिधी यांचं निधन, अंत्यदर्शनासाठी रजनीकांत राजाजी हॉलमध्ये

3,586 views · Published 8 August 2018 · 2:49 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यविधी होणार आहेत. काल दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नईतील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  काल संध्याकाळी करुणानिधी यांची प्राणज्योत मावळली... करूणानिधींच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये आज राजकीय दुखवटा तर केंद्र सरकारनं देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. तर बिहार सरकारनं आज आणि उद्या असा दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केलाय...शिवाय तमिळनाडूतल्या शाळांनाही आज सुट्टी देण्यात आलीय...

More from this channel